




















माझा पहिला दिवस किचनमधला
मला ही गोष्ट सांगताना खूप आनंद होतो आणि खूप हसू येतंय
तुम्हाला जेव्हा अचानक कोणी तरी काय तरी एखादा नवीन पदार्थ बनवायला सांगतो किंवा जुनच पदार्थ नवीन पद्धतीने बनवायला सांगतो तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटतं जर तुम्हाला ते बनवायला येत नसेल.
असंच काहीतरी माझ्याबाबत झाल्या जेव्हा सासुबाई मच्छी फ्राय करत होत्या आणि त्यांना एक अचानक मध्येच कॉल येतो आणि त्या मला सांगतात की ही फिश व्यवस्थित फ्राय कर आणि जेव्हा ते मी फ्राय करायला जाते तेव्हा त्या मच्छीचा पूर्ण चेंदामेंदा होऊन जातो आणि सासूबाई अगदी तोंडात मारल्यासारखं माझ्याकडे पाहतात आणि माझ्यावर चिडतात.
कारण त्यावेळी दुसरा काही पर्याय उपलब्ध नसतो आणि दुसर विषय घरांमध्ये नसत किंवा दुसरी भाजी बनवण्यासाठी वेळ नसतो अगदी दुपारचे दोन अडीच वाजलेले असतात आणि जेवणाचा टाइम झालेला असतो आणि त्यालाच मोमेंट मध्ये काय करत असताना माझ्याकडून घडलेली ती चूक झालेली असते त्यातूनच एक शिकायला मिळतं काहीतरी नवीन की तुम्ही जेव्हा लग्न करता किंवा लग्नाच्या आधी तुम्हाला जेवण बनवता येणे किती गरजेच आहे.
जर तुम्हाला लग्नाच्या आधी जेवण बनवता येत असेल तर ते खूप चांगली गोष्ट आहे आणि जर नसेल तर तुम्ही बनवायला शिकून घ्या कारण जेव्हा केव्हा तुम्हाला असं पाहुण्यांमध्ये किंवा दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर प्रथम जेवण बनवायला सांगतात तेव्हा तुमची फजिती होऊ नये किंवा तुमच्या कडून कोणत्या चुका होऊ नये असं वाटत असेल तर किमान बेसिक पदार्थ आपल्याला बनवता आले पाहिजेत.
तुम्ही जेवणामध्ये कोणता पदार्थ बनवता याला काही महत्त्व नाही जर पदार्थ हे त्यांच्या आवडीचे असत असतील तर ते खुश होतात आणि जर त्यांच्या आवडीचे नसतील तर त्यांना वाईट वाटतं जर टेस्ट आवडली तर ते तुम्हाला पुन्हा बनवायला सांगतात आणि जर नाही आवडली तर तोंड फुगवतात आणि हिला काहीच येत नाही असेही टोमणे मारण्याची शक्यता असते.
हे प्रत्येकाचेच घरी ठरलेला असतं असं नाही काही ठिकाणी नवीन मुलींकडून झालेल्या चुका पदरात घेतल्या जातात परंतु काही ठिकाणी हे मान्य होत नाही अजूनही किती समाज पुढे गेला असला तरी मुलींनी जेवण बनवणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं त्यांना वाटतं.
एकच स्री जेव्हा अन्नपूर्णा होते तेव्हा ती एक ,आई ,मुलगी, सून,पत्नी , पूर्ण यांची कर्तव्य पूर्णपणे पार पडू शकते असं मानलं जातं.
लोकांना काय वाटतं यापेक्षा तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय बनवतात तुम्हाला काय येतं आणि तुम्हाला काय शिकावं असं वाटतं तुमची जर त्या गोष्टीमध्ये आवड असेल तर तुम्ही जेवण बनवणे नक्की शिका जर तुम्हाला ते आवडत नसेल तर वरील जे काही ब्लॉग मध्ये लिहिला आहे याचा जास्त विचार करू नका आणि तुमचा करिअर कडे लक्ष द्या हा एक मोलाचा सल्ला.
जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर ब्लॉग ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो भेटूया पुढच्या पोस्टमध्ये.